पाकिस्तानला जागतिक बँकेकडून 58.8 कोटी डॉलरची मदत

आधीच कंगाल झालेला आणि कोरोनाच्या महामारीमुळे पूर्णपणे ढेपाळून गेलेल्या पाकिस्तानला जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेने मदतीचा हात पुढे केला आहे. दोन्ही बँकांनी पाकिस्तानला संयुक्तरित्या 58.8 कोटी डॉलर्सची मदत करणार असल्याची हमी दिली आहे.

पाकिस्तानच्या योजना आयोगातील अधिकारी आणि दोन्ही बँकांच्या प्रतिनिधींची एक बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही बँकांनी कर्जाच्या रुपात पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यास तयारी दाखवली आहे, अशी माहिती योजना आयोगाच्या अधिकाऱयांनी दिली. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जागतिक बँकेकडून 23.8 कोटी डॉलर्स, तर आशियाई विकास बँकेकडून 35 कोटी डॉलर्सची मदत मिळणार आहे, असे संबंधित अधिकाऱयांनी बैठकीनंतर जाहीर केले.

जगभरातील कोरोना बळी

  • इटली – 3405
  • अमेरिका – 217
  • चीन – 3248
  • फ्रान्स – 372
  • इराण – 1433
  • जपान – 33
  • दक्षिण कोरिया – 94
  • स्पेन – 1002
  • युनायटेड किंगडम – 144
आपली प्रतिक्रिया द्या