
सामना ऑनलाईन । हरारे
यजमान झिम्बाब्वे संघाला येथे सुरू असलेल्या तिरंगी ट्वेण्टी-२० मालिकेत सलग तिसऱया पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशांना सुरुंग लागला. पाकिस्तानने त्यांना ७ गडी व ५ चेंडू राखून पराभूत केले आणि फायनलमध्ये प्रवेश केला. आता ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यामध्ये अंतिम लढत होईल हे निश्चित झाले आहे. झिम्बाब्वेकडून मिळालेल्या १६३ धावांचा पाठलाग करणाऱया पाकिस्तानने तीन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. फखर जमानने ४७ धावांची, हुसैन तलतने ४४ धावांची आणि कर्णधार सरफराज अहमदने नाबाद ३८ धावांची खेळी करीत पाकिस्तानचा विजय सुकर केला.




























































