पाकिस्तानची वाटचाल त्रिशंकू संसदेकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने पाकिस्तान त्रिशंकू संसदेकडे वाटचाल करत आहे. यामुळेच माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी रात्री सर्वपक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. आतापर्यंत जाहीर निकालांमध्ये कारावासातील इम्रान खान यांच्या ‘तहरीक इ इन्साफ’ पक्षाच्या पाठबळावर उभ्या अपक्ष उमेदवारांनी 92 जागा जिंकून शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाला धक्का दिला आहे.

नवाझ यांच्या पक्षाला 63 आणि पीपीपीला 50 जागा मिळाल्या तर अन्य लहान पक्षांना 19 जागा मिळाल्या आहेत. नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण 336 जागांपैकी साधे बहुमत मिळवण्यासाठी 169 जागांची आवश्यकता आहे. दरम्यान, स्वात प्रांतात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. यादरम्यान, झालेल्या गोळीबारात एक कार्यकर्ता ठार तर 8 ते 10 जण जखमी झाले.