जगातील पहिली ‘फ्लाय आणि ड्राईव्ह’ कार लॉन्च, किंमत… 

2062

जगातील पहिली ‘फ्लाय आणि ड्राईव्ह’ कार बुधवारी मियामी येथे एका इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. Personal Air Landing Vehicle, PAL-V असे या कारचे नाव आहे. आतापर्यंत याच्या 70 प्री-बुकिंग झाल्या आहेत. या कारची पहिली डिलिव्हरी 2021 मध्ये करण्यात येणार आहे. कंपनीने या कारच्या खरेदीसाठी एक अट ठेवली आहे. ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडे गाडीबरोबर विमान उड्डाण करण्याचा परवाना देखील असणे आवश्यक आहे.

काय आहे खास? 

19_12_2018-flyingcar19dec18p_18763918_13712917

ही कार 12,500 फूट उंचीवर उडू शकते. तसेच ही कार हवेत 321 किमी प्रतितास आणि रस्त्यावर 160 किमी प्रतितास वेगाने उडू आणि चालू शकते. टू सीटर या 680 किलो वजनी कारमध्ये 230 हॉर्स पॉवर, 4-सिलिंडर इंजिन आहे. अवघ्या 10 मिनिटात ही कार थ्री-व्हील कारमधून एका  Gyrocopter मध्ये बदलते. ही कार कार्बन फायबर, टायटॅनिअम आणि अल्युमिनियमने बनवण्यात आली आहे. या कारला उड्डाण करण्यासाठी 540 फूटची धावपट्टी असणे आवश्यक आहे. कंपनीने या कारची किंमत 4.30 कोटी इतकी ठेवली आहे.

युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीच्या म्हणण्यानुसार, कंपनी पाल-व्ही लिबर्टी स्पोर्ट या कारची स्वस्त आवृत्ती तयार करत आहे. ज्याची किंमत 2.40 कोटी रुपये असेल. या कारच्या प्रत्येक युनिटची क्षमता आणि मजबुती तपासण्यासाठी कमीतकमी 150 तास उड्डाण केले जाते. यादरम्यान या कारला अनेक कठीण चाचण्या पार कराव्या लागतात. ही कार 27 गॅलन गॅस टँकने सुसज्ज आहे. ज्यामुळे ही कार 500 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या