
चंद्रपुर जिल्ह्यात एका शेतकर्याला खवले मांजर आढळले. या सुजाण शेतकर्याने प्राणीमित्रांना पाचारण करून या खवले मांजराला जीवदान दिले आहे.
दुर्मिळ समजल्या जाणारे खवल्या मांजर सावली येथील रामप्रसाद शिंदे यांचा शेतातील झाडावर दिसून आले. त्यांनी लागलीच टायगर वन्यजीव रक्षक संस्थेचा पदाधिकार्यांनी माहीती दिली. संस्थेचा प्राणीमित्रांनी शेत गाठून खवल्या मांजराला सूखरूप झाडावरून उतरविले. वनविभागाकडे नोंद करून खुल्या वनक्षेत्रात खवल्या मांजराला सोडण्यात आले. खवल्या मांजराचे खवले काही आजारांवर उपयोगाचे ठरतात असा गैरसमज आहे. त्यामुळे या जिवाची शिकार केली जाते. परिणामी त्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. खवले मांजर हा जीव दुर्मिळ समजला जातो.

























































