‘भावांनो मी आज तुम्हाला सोडून जातोय’, व्हाट्सअॅप ‘स्टेटस’ ठेवून तरुणाने केली आत्महत्या

911

पत्नीच्या अपघाती मृत्यूमुळे नैराश्येत गेलेल्या सार्थक बचाटे नामक तरुणाने सोमवारी सकाळी व्हाट्सअ‌ॅपवर आपल्या मृत्यूचे स्टेटस ठेवत आत्महत्या केली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सार्थकने सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावाशेजारील शेतात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, गंगाखेड येथे सर्व्हिसिंग सेंटर चालवणाऱ्या सार्थक बचाटे यांचा 11 फेब्रुवारीला गंगाखेड-परळी रोडवर अपघात झाला होता. त्यात पत्नी चंदा यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तो नैराश्यात होता . त्यातूनच सोमवारी सकाळी त्यांनी आपल्या व्हाट्सअ‌ॅपच्या स्टेटसवर पत्नीला उद्देशून ‘मी तुला भेटायला येत आहे’ तसेच आपल्या परिवारासह मित्रांनाही उद्देशून स्टेटस ठेवले होते. त्याच्या मित्रांनी व नातेवाइकांनी हे स्टेटस पाहिल्यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, ते घराच्या पाठीमागील एका शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीला उद्देशून व्हाट्सअ‌ॅपवर स्टेटस ठेवले होते. ज्यामध्ये त्याने ‘मी तुला भेटायला यायलो’ असे लिहिले. तर, दुसऱ्या एका स्टेटसमध्ये त्याने आपल्या आई-वडिलांसह बहीण व भावजी यांची माफी मागितली. तिसऱ्या स्टेटसमध्ये आपल्या मित्रांना उद्देशून अखेरचा निरोप घेतला. त्यात त्याने ‘भावांनो, तुम्हाला सोडून आज मी जायलो’ असे लिहिले आहे. याप्रमाणेच आणखी एका स्टेटसमध्ये त्याने ‘आपल्या मरणाला कोणालाही जबाबदार धरू नये’, असे स्पष्ट केले आहे. पत्नीच्या निधनामूळे नैराश्यात आलेल्या सार्थकने महिनाभराच्या आतच हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या