पर्यावरणपूरक देखाव्यातून ‘डिमेन्शिया’विषयी जनजागृती, पारशीवाडी मित्र मंडळाचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. याच विचारातून आर्थर रोडचा राजा अर्थात पारशीवाडी मित्र मंडळाच्या वतीने यंदा ‘आठवणींचा गणराया’ हा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून डिमेन्शिया अर्थात स्मृतिभ्रंशाबाबत जनजागृती करण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात आला आहे.

वय वाढताना काही व्यक्तींमध्ये स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता, दैनंदिन कामकाज आणि ओळखीच्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या क्षमतेमध्ये बदल होऊ शकतात. डिमेन्शियाच्या अनेक प्रकारांमध्ये आजवर निश्चित असा सर्वसमावेशक इलाज उपलब्ध नसला, तरी योग्य वैद्यकीय सल्ला, थेरपी, मानसिक-सामाजिक आधार आणि नियमित बौद्धिक व सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून व्यक्तीचे दैनंदिन जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सक्रिय ठेवण्यास मदत होऊ शकते. हाच सकारात्मक संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. विशेषतः डिमेन्शियाग्रस्त व्यक्तींना केवळ आजाराच्या चौकटीत न पाहता, त्यांच्या भावना, आठवणी आणि व्यक्तिमत्त्वाचा आदर करून त्यांच्यासोबत संवाद साधणे किती महत्त्वाचे आहे, हे या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आले आहे. डॉ. सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारला आहे.