
सामना प्रतिनिधी । हावडा
देशभरात आता लोकसभा निवडणुकीचा ‘इलेक्शन फीव्हर’ जोर धरू लागला आहे. नागरिकांमध्ये मतदानासाठी जागृती व्हावी या उद्देशाने पश्चिम बंगालच्या हावडा शहरातील एका हलवायाने अजब शक्कल लढवली आहे. अर्थात त्याच्या या शक्कलीचा त्याला चांगला आर्थिक लाभही होत आहे.
West Bengal: A confectionery shop in Howrah, is selling sweets with symbols of political parties engraved on them. The owner of the shop Pradeep Haldar says, “I thought of creating awareness about voting through sweets, it will also enhance the profit. it’s a new method.” pic.twitter.com/ie9mnMzo35
— ANI (@ANI) March 22, 2019
हावडा येथील एका मिठाईच्या दुकानाचे मालक प्रदीप हलदर यांनी ही शक्कल लढवली आहे. आपल्या दुकानात विविध प्रकारच्या मिठायांवर विविध राजकीय पक्षांची चिन्हे त्यांनी साकारली आहे. लोकांनी योग्य उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी आपला हा प्रयत्न असल्याचा दावा हलदर यांनी केला आहे. या प्रयत्नामुळे आपल्याला चांगला आर्थिक फायदाही होत असल्याचे त्यांनी सांगितले, हावडाच्या नागरिकांनाही ही शक्कल आवडली असल्याचे हलवाई हलदर यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यात मतदान
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. सात टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे. त्यानंतर 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल आणि भाजप यांच्यात लोकसभेचे जबर घमासान रंगणार आहे.

























































