कोरोना व्हायरसमुळे ओढवलेल्या महाभयंकर संकटातही शिवसैनिक मदतीसाठी रस्त्यावर उतरला आहे.
दवाखान्यात असलेले रुग्ण, त्यांचे नातलग, बंदोबस्तावरील पोलीस, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांच्यासाठी चहानाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची सोय शिवसैनिकांनी पदरमोड करून केली आहे.
काही शिवसैनिकांनी तर रुग्णांसाठी गेले तीन दिवस घरून तीन वेळेसच्या जेवणाचे डबे पुरवले.