Photo – फोर्ब्सने जाहीर केली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी, हिंदुस्थानातीलही ‘या’ उद्योगपतींचा समावेश

फोर्ब्स मासिकाने नुकतीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत जगभरातील श्रीमंतांची नावे आहेत. या यादीनुसार जगभरात कोविड -19 ची दहशत असूनही अब्जाधीशांसाठी हे वर्ष खूपच खास राहिले आहे. जगातील टॉप 10 मध्ये कुणी स्थान पटाकावलं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

amazon-boss-jeff-bezos

1. फोर्ब्सच्या यादीत जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 177 अब्ज डॉलर एवढी आहे.

elon-musk-1

2. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन मस्क यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. टेस्लाच्या शेअर्सची 705% वाढीसह ते 151 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

bernard-arnault

3. फोर्ब्सच्या यादीत यादीत तिसऱ्या क्रमांकावर एलव्हीएमएचचे सीईओ बर्नारड अर्नाल्ट हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 150 अब्ज डॉलर एवढी आहे.

bill-gates

4. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे या यादीत चौथ्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 124 अब्ज डॉलर एवढी आहे.

facebook-ceo

5. श्रीमंत लोकांच्या यादीत फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग हा पाचव्या स्थानी असून त्याची संपत्ती एकूण 97 अब्ज डॉलर एवढी आहे.

warren-buffett

6. श्रीमंत लोकांच्या यादीत वॉरेन बफेट हे सहाव्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 96 अब्ज डॉलर एवढी आहे.

larry-ellison

7. 7 व्या स्थानावर सॉफ्टवेअरचे सीईओ लॅरी इलिसन हे आहेत. ज्यांची संपत्ती 93 अब्ज डॉलर आहे.

larry-page

8. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज हे या यादीत 91.5 अब्ज डॉलरसह 8 व्या स्थानी आहेत.

sergey-brin

9. गुगलचे दुसरे सहसंस्थापक सर्जी ब्रिन हे या यादीत 89 अब्ज डॉलरसह 9 व्या स्थानी आहेत.

mukesh-ambani

10. हिंदुस्थानी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या यादीत दहावे स्थान मिळविले आहे. यासह मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 84.5 अब्ज डॉलर एवढी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या