
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अरुण जेटली यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कारभार पियूष गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प जेटली नाही तर पियूष गोयल मांडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून हंगामी अर्थमंत्रीपदासाठी गोयल यांची निवड करण्यात आली आहे.
Arun Jaitley will be designated as Minister without portfolio during the period of his indisposition or till such time he is able to resume his work as Minister of Finance and Minister of Corporate Affairs. https://t.co/qh80IPqD2E
— ANI (@ANI) January 23, 2019
अरुण जेटली यांच्यावर गेल्यावर्षी किडनी प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच त्यांना कॅन्सर असल्याचेही समोर आल्याने महिन्याच्या सुरुवातीला ते पुढील तपासणीसाठी अमेरिकेला गेले आहेत. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून अद्याप ते हिंदुस्थानात आलेले नाहीत. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कारभार रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अर्थमंत्रालयाचा कारभार पियूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आल्याने अरुण जेटली बिनखात्याचे मंत्री म्हणून राहतील.
संसदेचे अखेरचे अर्थसंकल्पीय अधिवेश 31 जानेवारीपासून सुरू होणार असून अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे.




























































