
चीनमधील शांघाय येथे कोरोनाव्हायरस रोग (COVID-19) चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आले आहे. अनेक दवाखाने, हॉस्पिटल बाहेर तापाने आजारी असलेल्या रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर फेस मास्क आणि फेस शील्ड घातलेल्या महिला रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. चीनमधील शांघाय येथे कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव सुरू असताना एक महिला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर COVID-19 साठी रॅपिड अँटिजेन चाचणी घेताना दिसत आहे. तर तिच्या आसपास मोठी रांग लागल्याचं दिसत आहे.




























































