
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाली आहे. शुक्रवारी या दोन्ही नेत्यांच्या ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येत हजारोंनी घट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या २ लाख ८४ हजार ७४६ ने घटली आहे. मोदींची ट्विटर फॉलोअर्सची संख्या सध्या ४३.१ मिलियन आहे. दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या १७ हजार ५०३ ने घटली आहे. सध्या त्यांच्या ट्विटरवरी फॉलोअर्सची संख्या ७.३३ मिलियन आहे. एएनआयने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
लोकप्रिय सोशल साईट ट्विटरने अनेक संशयास्पद आणि निष्क्रिय ट्विटर खाती बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक मोठ्या नेत्यांच्या फॉलोअर्सची संख्या अचानक घटली आहे. यात पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, काँग्रेस नेते शशी थरूर, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, वस्त्रोद्यग मंत्री स्मृती इराणी यांच्या फॉलोअर्सची संख्या घटली आहे.
किती फॉलोअर्स घटले –
पंतप्रधान नरेंद्र मोदी – २ लाख ८४ हजार ७४६
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी – १७ हजार ५०३
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज – ७४ हजार १३२
काँग्रेस नेते शशी थरूर – १ लाख ५१ हजार ५०९
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन – १० हजार ९०२
वस्त्रोद्यग मंत्री स्मृती इराणी – ४१ हजार २८०
























































