
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे. चित्रपट निर्माते संदीप सिंह यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट याआधी पाच एप्रिलला प्रदर्शित होणार होता.
Producer of film ‘PM Narendra Modi’, Sandeep Singh tweets: This is to confirm, our film ‘PM Narendra Modi’ is not releasing on 5th April. Will update soon. pic.twitter.com/MD26UHpUxq
— ANI (@ANI) April 4, 2019
‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट येत्या 5 एप्रिलला प्रदर्शित होणार नाही, अशी माहिती निर्माते संदीप सिंह यांनी दिली आहे. परंतु हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. या चित्रपटाला अद्याप सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळाली नसल्याने प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे निर्मात्यांच्या वकिलांनी वकिलांनी ‘इंडिअन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.
विरोधकांचा आक्षेप
निवडणुकीच्या काळामध्ये प्रदर्शित होणाऱ्या या बायोपिकवर विरोधकांचा आक्षेप आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार विरोधकांना केली होती. त्यानंतर हा मुद्दा न्यायालयात गेला होता. मुंबई हायकोर्टाने याच आठवड्यामध्ये याविरोधातील याचिका फेटाळली होती.




























































