पंतप्रधान मोदी म्हणतात, आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले, आणखी काय करू?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो: पीटीआय

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्जात रुतलेल्या एअर इंडियासह सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्या विकण्याचा मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने मोकळा केला असला तरी या कंपन्या खरेदी करण्यासाठी कोणीच पुढे येत नाहीय. पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले, पण कोणी ग्राहक पुढे येत नाहीय. आम्ही तरी काय करणार?

एअर इंडिया डबघाईला येणे ही सरकारसाठी चिंतेची बाब आहे. ‘स्वराज्य’ या नियतकालिकाला मोदी यांनी नुकतीच मुलाखत दिली तेव्हा त्यांना प्रामुख्याने याच विषयावर विचारण्यात आले. त्यावर मोदी म्हणाले, ‘योग्य वेळ आणि प्रक्रिया याचाच हा भाग आहे.’

मोदींचे काय म्हणणं?
– एअर इंडियासह काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या विक्रीबाबत आम्ही अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. पण आपल्याला मिळालेला प्रतिसाद आणि धोरणात्मक निर्णय यातील फरक लक्षात घ्यावा लागेल.
– मे महिन्यात एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सरकारने सुरू केली होती, परंतु ती सपशेल अपयशी ठरली. त्यानंतर मोदी यांनी प्रथमच त्यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘एअर इंडिया किंवा अन्य कोणतीही सार्वजनिक क्षेत्रातील जास्त किंमत येत असतानाही आम्ही कमी किमतीत विकली हे बालंट आमच्यावर येऊ नये हाच आमचा प्रयत्न आहे.