
शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने वृद्धाची 53 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. राहुलकुमार जैस्वाल असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून आयटी क्षेत्रातून निवृत्त झाले आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात त्यांना सोशल मीडियावर एक खासगी ंपनीची जाहिरात दिसली. त्यामुळे त्याने ती लिंक ओपन करून नोंदणी केली होती. त्यानंतर त्याना एका महिलेने संपर्क करून शेअर गुंतवणूक केल्यास चांगला नफा होईल असे भासवले. त्यावर विश्वास ठेवून त्याने एकूण 53 लाख 72 हजार रुपयांची गुंतवणूक केली. केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना फायदा झाल्याचे दिसले. मात्र वारंवार प्रयत्न करून त्यांना ती रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करता येत नव्हती. त्यामुळे त्याने विचारणा केली तेव्हा त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुलकुमार जैस्वालला ताब्यात घेतले. अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.




























































