
पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत कायम असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक झोन प्रमुखांनी विशेष प्लॅनिंग करून सराईत टोळ्या, भाईगिरी-दादागिरी करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा आराखडा तयार करावा. विशेषतः महिला सुरक्षितता, वाहतूककोंडी सोडविणे, खासगी सावकारकीला आळा, बीट मार्शलिंग वाढविणे, हद्दीतील शांतता कायम ठेवण्यासाठी सर्वच पोलिस उपायुक्तांनी लक्ष देण्याचा कानमंत्र पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.
पोलिस आयुक्तालयात आयोजित बैठकीला सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, अमोल झेंडे, विजय मगर, श्रीनिवास घाडगे उपस्थित होते.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. त्यापाश्र्वभूमीवर गुंडगिरी आणि दादागिरी करणाNयांचे रेकॉर्ड तयार करून कारवाईचा बडगा आवश्यक आहे. कोणाजाही मुलाहिजा न ठेवता गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी प्राधान्य द्यावे. त्याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत दाखल महिलांचे तक्रारी अर्ज पेडिंग ठेउ नका. त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नवनियुक्त पोलीस उपायुक्तांना दिल्या आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून मॉर्निंग वॉकसाठी जाणाNया नागरिकांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. त्यासंबंधित हद्दीतील बीट मार्शलिंग वाढविणे, साध्या वेशातील कर्मचारी अधिकारी तैनात करावेत. जेष्ठ नागरिकांची लुटमार थांबविण्यासाठीही प्राधान्य देण्याचे आदेशही दिले आहेत.
विविध भागातील वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिस ठाणे स्तरावरील अधिकाNयांसह वाहतूक अधिकाNयांनी समन्वयाने नियोजन करावे. त्याद्वारे मुख्य चौकासह मध्यवर्ती ठिकाणांसह उपनगरांमध्ये वाहतूककोंडी टाळण्यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी उपायुक्तांवर सोपविण्यात आली आहे. विशेषतः दर शनिवार आणि रविवारसह सुटीच्या दिवशी होणाNया वाहतूककोंडीवर उपाययोजना कराव्यात. हद्दीतील ब्लॅकस्पॉट, अरूंद रस्ते, गर्दीचे चौक, अतिक्रमण पदपथांचा अहवाल तयार करावा लागणार आहे. वाहतूक नियमनासाठी संबंधित उपायुक्तांनी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीपासून नागरिकांची सुटका होण्यास मदत होणार आहे.
नागरिकांची सुरक्षितता महत्वाची असून त्यादृष्टीने वेळोवेळी दक्षता घेतली जाते. वाहतूक नियमन, महिला सुरक्षिततेला आणखी बळकटी देण्यात आली आहे. विशेषतः सराईत टोळ्या आणि भाईगिरी करणाNयांविरूद्ध कारवाईचा बडगा कायम ठेवण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. त्याशिवाय आरोपींचे रेकॉर्ड तयार करून उर्वरित गुन्हेगारी मोडीत काढण्याचे लक्ष्य आहे. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर
























































