बिहारमधील अल्पवयीन बालकांना कामावर ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरातील एमआयडीसी मधील प्लास्टिकच्या चप्पल बूट बनवण्याच्या कारखान्यामध्ये बिहारमधील अल्पवयीन बालकांना कामावर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामध्ये काम करणाऱ्या लता शाम गिरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, लातूर येथील जुन्या एमआयडीसी मध्ये प्लॉट नंबर 42 येथे असणाऱ्या प्लास्टिक बुट चप्पल बनवण्याच्या कारखान्यात असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी त्यांनी छापा टाकला त्यावेळी व्यवस्थापक सद्दाम नाझीम काझी तिथे होता. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दोन अल्पवयीन मुले ( राहणार मोहन बढीया पोस्ट थाना सक्री जिल्हा मधुबनी बिहार ) हे काम करत असल्याचे निदर्शनास आले. येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात व्यवस्थापक सद्दाम काझी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.