एखादी गोष्ट करायची ठरवल्यास माणूस कोणत्याही परिस्थितीत आपले स्वप्न साकार करतो. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. लहान मुलांच्या शिकवण्या घेत, रिसेप्शनिस्टची पार्टटाइम नोकरी करून पूजा यादव या तरुणीने आयपीएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. पूजा जर्मनीमध्ये नोकरी करीत होती. पण यूपीएससीची तयारी करण्यासाठी तिने ही नोकरीही सोडली.
20 सप्टेंबर 1988 रोजी हरियाणा मध्ये जन्मलेल्या पूजाने तेथेच आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर बायो टेक्नोलॉजी आणि फूड टेक्नोलॉजीमध्ये एम टेक केल्यानंतर तिने जर्मनी आणि पॅनडामध्ये नोकरी केली. काही काळ काम केल्यानंतर तिला लक्षात आले की आपण दुसऱया देशाच्या विकासात भर घालत आहे. तिने परदेशातील नोकरी सोडून यूपीएससीची तयारी सुरू केली. 2018 ची नागरी सेवा परीक्षा पूजा यांनी दुसऱया प्रयत्नात उत्तीर्ण केली. त्यांना रँक 174 मिळाला. त्या गुजरात केडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
पूजा यांची घरची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. यूपीएससी परीक्षेच्या तयारीचा खर्च करता यावा यासाठी त्यांनी लहान मुलांच्या शिकवण्या घेतल्या. तसेच रिसेप्शनिस्टची नोकरीही केली. 2021 मध्ये त्यांनी आयएएस विकास भारद्वाज यांच्याशी लग्न केले. दोघेही मसुरी येथील लाल बहादुर शास्त्राr नॅशनल अपॅडमी ऑफ adminstration मध्ये पहिल्यांदा भेटले होते.