
सामना ऑनलाईन, लिस्बन
पोर्तुगालच्या संसदेने लिंग बदलण्याच्या कायद्याला मंजूरी दिली आहे. या कायद्यानुसार १६ वर्षाहून अधिक वयाची व्यक्ती आपले लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया करू शकतो व आपले नावही बदलू शकतो. या साठी कुठल्याच वैद्यकीय तपासणीची आता गरज नसणार. हा कायदा पूर्वी युरोपमध्ये डेन्मार्क, माल्टा, स्वीडन, आयर्लँड आणि नॉर्वे या देशांत पारित झाला होता. पोर्तुगाल हा ६ वा युरोपीय देश आहे ज्याने हा कायदा पारित केला.
आपण स्त्री आहोत, पुरुष आहोत की तृतीयपंथी आहोत हे सांगण्यासाठी आता तिसर्या व्यक्तीची गरज नाही असे सांगून संसदेच्या सदस्यांनी या कायद्याच्या बाजूने मतदान केले. पोर्तुगाल मध्ये २०११ साली आलेल्या एका कायद्यानुसार तृतीयपंथी नागरिकांना जेंडर डिस्फोरियासाठी वैद्यकीय चाचणी करणे अनिवार्य होती. जेंडर डिस्फोरिया म्हणजे एका व्यक्तीला समलिंगी व्यक्तीबाबत आकर्षण असेल तर त्याला जेंडर डिस्फोरिया म्हणतात. पूर्वी लिंग बदलण्यासाठी ही चाचणी अनिवार्य होती, नव्या कायद्यानुसार ही चाचणी रद्दबातल करण्यात आली आहे.



























































