प्रदीप शर्मा यांची नऊ तास कसून चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pradip sharma mumbai police encounter cop

 

माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची गुरुवारी आयए कार्यालयात तब्बल नऊ तास कसून चौकशी करण्यात आली. शर्मा यांची गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी झाली.

बुधवारी जवळपास आठ तास चौकशी झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा शर्मा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शर्मा एनआयए कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. रात्री दहाच्या सुमारास प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयातून बाहेर पडले.