दूरदर्शनचा चेहरा असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या कारकिर्दीला दूरदर्शनपासून सुरुवात झाली. त्यांच्या भारदस्त आवाजासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांचा आवाज आणि बातम्या वाचण्याची शैली यामुळे दूरदर्शनच्या बातम्यांची ते ओळख बनले होते. त्यांच्या निधनाने बुलंद आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

दूरदर्शनवर त्यांनी 1974 मध्ये त्यांनी वृत्तनिवेदनाला सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदन केले. त्यांच्या बातम्या वाचण्याच्या शैलीमुळे आजही ते प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. दूरदर्शनवर वृत्तनिवेदनासह त्यांनी अनेक जाहिराती, लघुपट,माहितीपट यांच्यासाठीही आवाज दिला होता. तसेच ते उत्तम सूत्रसंचालक होते.