
>> प्रज्ञा साबळे
कल्पनांचे व्यवसायात रूपांतर करत, अडथळ्यांना सामोरे जात लघुउद्योगक्षेत्रात स्वतची मुद्रा उमटवणाऱया प्रेरणादायी महिलांची ही यशोगाथा.
महिला उद्योजकता दिनानिमित्त महाराष्ट्रातील दोन महिलांकडून रोजच्या कल्पनांचे व्यवसायात रूपांतर. महाराष्ट्रातील दोन महिलांची प्रेरणेला उद्योगात बदलण्याची कहाणी.
व्यवसायाची कल्पना आयुष्यातील अगदी ओळखीच्या गोष्टींमधूनही येऊ शकते. एका महिलेसाठी निसर्गावरचे आयुष्यभराचे प्रेम तर दुसऱ्या महिलेसाठी मातृत्वाचा अनुभव आणि आपल्या मुलाला गुंतवून ठेवण्याचे अर्थपूर्ण मार्ग शोधणे ही ती कल्पना होती. महाराष्ट्रातील दोन उद्योजिकांसाठी हेच दैनंदिन अनुभव त्यांच्या स्वतच्या व्यवसायांसाठी सुरुवातीचा टप्पा ठरले.
‘उद्योजक महिला दिन’ 22 सप्टेंबर रोजी साजरा होत असताना अशा कथांमधून एक झलक मिळते. त्यातून महिला कशा प्रकारे आपल्या आवडी, अनुभव आणि कल्पनांना उद्योजकतेच्या प्रवासात रूपांतरित करत आहेत आणि त्याच वेळी स्वतसाठी व आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी संधी निर्माण करत आहेत हे दिसते.
पुण्यातील अनिंदिता चौधरी यांच्यासाठी ही कल्पना निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्यातून रुजली होती. व्यावसायिक कारकीर्द आणि आपल्या जुळ्या मुलांच्या संगोपनासाठी वेळ दिल्यानंतर त्यांनी 2017 मध्ये आपल्या बचतीतून ‘इकोसर्व्ह इंडिया’ सुरू केले. सुपारीच्या पानांपासून बनवलेल्या उत्पादनांपासून सुरुवात करून या व्यवसायाचा विस्तार काऊना गवत, शीतलपाटी, बांबू, ताडाची पाने आणि जलकुंभ अशा नैसर्गिक सामग्रीपासून बनवलेल्या हस्तकला वस्तूंपर्यंत झाला.
अनिंदिता यांना आपल्या व्यवसायातून कारागीरांसाठी समान संधी निर्माण व्हाव्यात असेही वाटत होते. आज इकोसर्व्ह इंडिया 30 कारागीरांसोबत काम करते. त्यातील 90 टक्के महिला आहेत. त्यांना 2023 मध्ये वॉलमार्ट वृद्धीचा भाग झाल्यानंतर उत्पादन स्थिती, किंमत, पॅकेजिंग, इन्व्हेंटरी आणि लॉजिस्टिक्स यांबद्दल सखोल माहिती मिळाली. त्यांनी प्रमुख बाजारपेठ भागीदार असलेल्या फ्लिपकार्टवर आपल्या उत्पादनांची यादीही वाढवली. मागील वर्षीच्या तुलनेत 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात व्यवसायाच्या महसुलात 50 टक्के वाढ नोंदवली गेली.
रिना चौहान यांना नाशिकमध्ये त्यांच्या घराजवळच प्रेरणा मिळाली. एक आई आणि माजी शिक्षिका म्हणून रिना यांना मुलांचा क्रीन टाइम कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त खेळण्यासाठी प्रोत्साहित करायचे होते. या कल्पनेमुळे त्यांनी आरव्ही इंक. अंतर्गत ‘फन फ्राय टॉईज’ची स्थापना केली. त्याची उत्पादने सर्जनशीलता, शिक्षण आणि संज्ञानात्मक विकासावर केंद्रित आहेत.
वॉलमार्ट वृद्धीच्या माध्यमातून रिना यांना सोर्सिंग, पुरवठा साखळी व्यवस्थापन, ब्रँडिंग आणि ऑपरेशन्स यांसंबंधी व्यावसायिक ज्ञान मिळाले. या कार्यक्रमाने त्यांना फ्लिपकार्टवर सामील होण्यासही मदत केली. त्यामुळे ‘फन फ्राय टॉईज’ला संपूर्ण भारतातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
एकीला निसर्गात प्रेरणा मिळाली तर दुसरीला मातृत्वातून. अनिंदिता आणि रिना यांना जोडणारा दुवा म्हणजे दैनंदिन अनुभवांमधील शक्यता ओळखण्याची आणि त्या कल्पनांना एका उद्योगाचे स्वरूप देण्याची त्यांची क्षमता. या व्यावसायिक महिला दिनानिमित्त त्यांचा प्रवास हे दाखवतो देतो की, वैयक्तिकरीत्या अर्थपूर्ण असलेली एखादी गोष्ट एका मोठ्या गोष्टीचा पाया बनू शकते.



























































