
ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची निवडणूक होणार असून त्यासाठी 24 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत हिंदुस्थानी वंशाचे ऋषी सुनक यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. दीड महिन्यापूर्वी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या स्थायी सदस्यांच्या मतदानात ऋषी सुनक यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.




























































