
सामना ऑनलाईन । चेन्नई
भुवया उडवून एका रात्रीत युट्युब स्टार बनलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सध्या यशाच्या शिखरावर आहे. बॉलिवूडमधल्या दोन मोठ्या दिग्दर्शकांसोबत प्रियाला काम मिळालं आहे. त्यामुळे प्रियाचा भाव सध्या भलताच वधारलाय. प्रियाने एका जाहिरातीसाठी चक्क एक कोटी रुपयांची घसघशीत रक्कम घेतल्याची चर्चा सध्या टॉलिवूडमध्ये रंगली आहे. त्यामुळे टॉलिवूडमधल्या जाहिरातींसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत प्रिया सामिल झाली आहे.
प्रियाच्या एका जाहिरातीचे आजपासून शूटींग सुरू झाले. या शूटींगच्या सेटवर पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रिया फारच सुंदर दिसत होती. फक्त या जाहिरातीच्या शूटींगसाठी प्रियाला खास व्हॅनिटी व्हॅन देण्यात आली होती. एका मोठ्या अभिनेत्रीप्रमाणेच सेटवर प्रियाची बडदास्त ठेवली जात आहे. या जाहिरातीसाठी प्रियाने तब्बल १ कोटींचे मानधन घेतल्याचे समोर आले आहे. प्रिया तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्रॅण्डचे प्रमोशन करण्यासाठी जवळपास आठ लाख रुपये घेत असल्याचे देखील समजते. प्रियाचे इंस्टाग्रामवर जवळपास सत्तर लाख फॉलोअर्स आहेत.

























































