
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
परळीच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वपरिचित व वैद्यनाथ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राणीशास्त्र विभागप्रमुख निर्भिड- न्यायप्रिय प्रा. व्ही. बी. देशपांडे यांचे वृद्धापकाळाने आज दि. २९ रोजी सकाळी ६.०० वाजता त्यांच्या राहत्या घरी दुःखत निधन झाले. ते ७५ वर्षे वयाचे होते. त्यांच्या प्रश्चात पत्नी, सुन, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
दिवंगत प्रा. व्ही. बी.देशपांडे हे वैद्यनाथ महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागप्रमुख म्हणून मे २००४मध्ये प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत झाले. त्यांच्या शौक्षिणक सेवा कार्यची सुरूवात वैद्यनाथ विद्यलाय येथे विज्ञानाचे शिक्षक म्हणून झाली होती. अत्यंत मनमिळाऊ, स्पष्ट, निर्भिड, सत्यनिष्ठ मत मांडणारा त्यांचा स्वभाव सर्व परिचित होता. प्रा. व्ही बी देशपांडे यांची ज्ञानदान करण्याची हातोटी अत्यंत स्पष्ट सोप्या भाषेत सरळ साधी अशी प्रसिध्द होती. विद्यार्थ्यांची वर्गात शिस्त कशी असावी यावर त्यांच्या खास शैलीतील शिकवण अनेक विद्यार्थ्यांना जीवन परिवर्तनासाठी उपयोगी ठरली. त्यांच्या ज्ञानदान प्रक्रियेतून असंख्य विद्यार्थी आपल्या आयुष्यात मोठा पदावर विराजमान असून प्रत्येकाला त्यांचा प्रचंड आदर होता व राहील. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात न भरून येणारी हानी झाली आहे.
ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळीचे ते विद्यमान उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत ब्राह्मण सभेच्या वतीने गेल्या ४० वर्षापासून सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात या कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. त्यांच्या पार्थिवावर परळी येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

































































