चांगल्या पावसासाठी पुजार्‍यांची पाण्याच्या टोपात बसून पुजा, नेटकर्‍यांनी केले ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बेंगरुळू

देशात तापमानच चांगलेच वाढले असून नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. हवामान विभागानेही लवकरच पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. बेंगरुळूमध्ये काही पुजार्‍यांनी चांगल्या पावसासाठी पुजा केली आहे. परंतु या पुजेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकर्‍यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

बेंगरुळूच्या काही पुजार्‍यांनी चांगल्या पावसासाठी पुजा आणि होम हवन केले आहे. त्यातील दोन पुजारी पाण्याच्या भांड्यात बसले आहेत आणि मंत्र म्हणत आहेत. तर एक पुजारी होम करत आहे. एक तरुण पुजारी चक्क मोबाईलवर मग्न आहे. यावर नेटकर्‍यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

पुजारी इंद्र देवला मेसेज करत आहे का? असा प्रश्न विचारला आहे. तर एकाने देवाकडे प्रार्थना लगेच पोहोचेल कारण ४जी सुरू आहे असे म्हटले आहे. एकाने तर मुंबईत राहण्यार्‍यांची अवस्था असून जेव्हा त्यांना घरात स्विमिंग पूल नसते अशी अवस्था होते असे म्हटले आहे.