
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लासीपोरा येथे दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चौघांपैकी दोन जण हे गुरुवारी पोलीस दलातून पळून दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदमध्ये दाखल झालेले अधिकारी (SPO) आहेत. शत्र घेऊन पळालेल्या या दोघांचा खात्मा झाल्याने आतापर्यंतच्या कारवाईतील हे मोठे यश मानले जात आहे.
#UPDATE Two Special Police Officers who decamped with weapons yesterday are among the four killed. https://t.co/r5sf1FHMSv
— ANI (@ANI) June 7, 2019
दक्षिण कश्मीरमधील लासीपोरा भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती जवानांना मिळाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. सुमारे 18 तास ही मोहीम सुरू होती. या दरम्यान, अद्यापही इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच या भागातील सुरक्षा देखील वाढवण्यात आली.




























































