
पुणे शहरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून मावसभावानेच बहिणीचे अपहरण करुन तिच्यावर मोटारीत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी दुपारी बावधन परिसरात घडली. याप्रकरणी बालेवाडी येथील एका 30 वर्षीय तरुणीने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३५ वर्षीय मावस भावाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी तरुणीचा आरोपी मावसभाऊ आहे. त्याने मावस बहिणीला बुधवारीला जबरदस्तीने मोटारीमध्ये बसवले. तो जबरदस्तीने घेऊन जात असल्यामुळे तरुणीने आईला फोन करुन माहिती दिली. त्यावेळी त्याचा राग आल्याने आरोपीने तीचा मोबाईल घेऊन फोडून टाकला. यानंतर हाताने मारहाण करत गाडीत गप्प बस नाहीतर मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने बावधान येथे गाडी बाजूला घेऊन तरुणीला दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करायचे नाही असे म्हणत बलात्कार केला. झालेल्या प्रकारानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.




























































