
रस्त्याने पायी चाललेल्या ज्येष्ठाचा पाठलाग करून त्यांच्याकडील मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना 8 जुलैला रात्री अकराच्या सुमारास कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर घडली.
याप्रकरणी मोहमद यासीन (59, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहमंद हे 8 जुलैला रात्री पावणेअकराच्या सुमारास एनआयबीएम रस्त्यावरून घरी चालले होते. त्यावेळी दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी त्यांना अडवून हातातील पाच हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. मोहमंद यांनी आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उनिरीक्षक समाधान मचाले करीत आहेत.



























































