पीएमपीएल बसमध्ये शिरताना ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमपीएल बसमध्ये शिरताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 35 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना 16 डिसेंबरला रात्री सव्वा सातच्या सुमारास हडपसरमधील भाजी मंडई परिसरात घडली. याप्रकरणी 74 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला 16 डिसेंबरला हडपसरमधील भाजी मंडई बस स्थानकात पीएमपीएलची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यानंतर काही वेळानंतर आलेल्या एका बसमध्ये शिरताना तीन ते चार चोरट्या महिलांनी गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील 35 हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करीत आहेत.