पुणे – तरूणाला स्नूकर स्टीक मारून केले जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेळण्यासाठी स्नूकर स्टीक दिली नाही म्हणून दोघांनी मिळून तरूणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत स्नूकर स्टीक मारून जखमी केले आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेनउच्या सुमारास बालेवाडीतील कबाना क्लब लो स्ट्रीटमध्ये घडली.

मनोज धनकुडे आणि गणेश (पुर्ण नाव नाही ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिषेक साहू (वय 24, रा. म्हाळुंगे) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दोन दिवसांपुर्वी अभिषेक बालेवाडीतील कबाना क्लब लोमध्ये स्नूकर खेळण्यासाठी गेले होते. अभिषेक व कुणाल मलिक स्नूकर खेळत होते. त्यावेळी तेथे आलेल्या मनोजने त्यांना खेळण्यासाठी स्नूकर स्टीक मागितली. मात्र, दोघांनी स्टीक देण्यास विरोध केल्याचा राग आल्यामुळे आरोपींनी अभिषेकला स्टीकने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस तपास करीत आहेत.