
रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण आठजणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा खळबळजनक घटना 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर कालावधीत वानवडी परिसरात घडली आहे.
याप्रकरणी पीडित मुलीने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 31 ऑगस्टला गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात एकटी आली होती.
त्यावेळी आरोपींनी तिला आता गाडी नाही, तू गावी कसी जाणार असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे रिक्षातून अपहरण करून वानवडी परिसरात नेले.
त्या ठिकाणी आरोपींनी रात्री तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशाही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वानवडी पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.

























































