पुण्यात छळास कंटाळून महिलेसह तरूणीची आत्महत्या, आंबेगाव आणि हडपसरमधील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सासरच्या छळाला आणि मामाच्या मुलीच्या त्रासाला कंटाळून महिलेसह तरूणीने राहत्या घरात आत्महत्या केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. पत्नीला कमी शिकलेली आहेस, तुझी बायको होण्याची लायकी नाही, असे म्हणत तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने विवाहितेने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या लोकांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबेगावमधील ओव्हीनिअर सोसायटीत घडली.

संगीता अनिल व्हावळे (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितचे नाव आहे. याप्रकरणी पती अनिल व्हावळे, पद्मिनी व्हावळे, अनिल व्हावळे, कल्पना व्हावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीचे वडील विलास पंडीत यांनी फिर्याद दिली आहे. संगीता आणि अनिल यांचे काही वर्षांपुर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर अनिल पत्नी संगीताला तू कमी शिकलेली आहेस, तुझी बायको होण्याची लायकी नाही, तू जेलमध्ये जाउन आलेली आहेस असे म्हणून शारिरीक व मानसिक छळ केला. त्यामुळे छळास कंटाळून संगीताने 20 मार्चला राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली.

दुसीऱ्या घटनेत तरूणाने चुलत मामाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी त्रास दिला. त्यामुळे त्रासाला कंटाळून तरूणीने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तरूणाविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योती वैâलास जगताप (वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी किरण भाउ शिंदे (रा. वैदवाडी, हडपसर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचा भाउ अक्षय जगताप यांनी फिर्याद दिली आहे. ज्योती आणि किरण एकाच परिसरात राहायला होते. त्यानंतर किरणने ज्योतीला प्रेमात अडकवून तिला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी त्रास दिला. त्यामुळे छळवणूकीला कंटाळून ज्योतीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत आहेत.