पंजाबी संगीतकार बंटी बैंस याच्यावर गोळीबार, सुदैवाने बचावला

पंजाबी इंडस्ट्रीतील संगीताकार बंटी बैंस याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले आहेत. बंटी बैस हे याआधी हत्या झालेले पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या जवळचे होते. सिद्धू मुसेवाला याच्या यशात बंटी बैस यांचा मोठा हात होता.

पंजाबमधील मोहाली शहरातल्या सेक्टर 79 मध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये बंटी बैस बसलेले असताना काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बंटी बैस यांना हल्ल्यानंतर एक कोटींची मागणी करणारा फोन आला. जर पैसे दिले नाही तर त्यांची हत्या केली जाईल, अशी धमकी देखील देण्यात आली आहे. हा फोन मोस्ट वाँटेड गँगस्टर लकी पटियाला याच्या नावाने केला गेला होता. लकी पटियाला हा लाँरेस बिश्नोई गँगचा सदस्य आहे.