धारावी बळकावण्यासाठी अदानींच्या मागे मोदींची ताकद; राहुल गांधी यांचा घणाघाती आरोप

देशातील सर्व महत्त्वाच्या पंपन्या, संपत्ती फक्त अदानी  आणि अंबानी यांनाच विकल्या जात आहेत. धारावी ही तुमची हक्काची जमीन आहे, परंतु दलालाच्या माध्यमातून ही जमीनही बळकावली जात आहे. धारावीची जमीन बळकावणाऱया अदानीच्या मागे देशाचे पंतप्रधान ईडी, सीबीआय, आयकर विभाग घेऊन उभे आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला देऊन पोलीस बळाचा वापर करून स्थानिक धारावीकरांना हुसकावले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला.

 

धारावीकरांनो जागे व्हा…

देश तुमच्या सारख्यांच्या मेहनतीवर उभा राहतो, दलालांमुळे नाही. परंतु आज मेहनत तुम्ही करता आणि पैसा अदानी घेऊन जातो. आज लढाई कौशल्य  आणि दलाल यांच्यात आहे. आज लढाई धारावी आणि अदानी यांच्यात आहे. त्यामुळे  तुम्हाला लुटले जात असून तुम्ही जागे व्हा, असे आवाहन राहुल गांधी यांनी धारावीकरांना केले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान धारावीत सभा झाली त्यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून मोदींवर टीकास्त्र सोडले.

धारावी तुमची आहे आणि तुमचीच राहिली पाहिजे. धारावीत सर्व प्रकारचे छोटय़ा-छोटय़ा वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन केले जाते. काwशल्याचे काम येथे होत आहे आणि या उद्योगाला पाठिंबा दिला पाहिजे. बँकांचे दरवाजे उघडे केले पाहिजेत. धारावी देशाचे उत्पादन हब बनवले पाहिजे. कारण धारावीच खऱया अर्थाने ‘मेक इन इंडिया’ आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

तर सरकार जनतेपासून वस्तुस्थिती लपवत आहे. देशाची वस्तुस्थिती कळावी आणि जनतेला जागृत करण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली. मागील दहा वर्षांत महागाई, बेरोजगारी कमी झालेली नाही. मोठे इव्हेंट करून काम होत असल्याचे दाखवले जात आहे, परंतु परिस्थिती तशी नाही. जीएसटी आणि नोटाबंदीने देशातील जनतेचे प्रचंड हाल केले आहेत. अग्निवीरमध्ये भरती होण्यास तरुण तयार नाहीत. चार  वर्षांची लष्करी सेवा करून काय करायचे अशी स्थिती या तरुणांची झालेली आहे. भाजप सरकार गरीबांसाठी काम करत नाही. ते फक्त धनदांडग्यांसाठी काम करते, अशी टीका प्रियंका गांधी यांनी यावेळी केली.ो