चोरी करून सगळी यंत्रणा अजित पवार स्वत:साठी वापरत आहेत; राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल

लोकसभेच्या सहा महिने आधी ती सगळी यंत्रणा चोरीला गेली. पक्ष चोरीला गेला, चिन्ह चोरीला गेले. ज्या मैदानावर गेली 40 वर्षे सभा होते ते मैदानही चोरीला गेले आहे. ती सगळी यंत्रणा अजित पवार स्वतःसाठी वापरत आहेत. आता सगळेच चोरीला जात असले तरी लोकांचा विचार चोरीला जाऊ शकत नाही, तोच विचार आणि तीच ताकद आहे आणि विजय हा तुतारीचाच होणार आहे, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

आमदार रोहित पवार बारामतीत बोलत होते. ते म्हणाले, दादा भाजपकडे का गेले संपूर्ण दुनियेला माहीत आहे. जर दादांना साहेबांचा आवाका माहीत असेल तर त्यांचा प्रश्न आहे. मात्र त्यांना आवाका खरंच माहिती असता तर दादांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती. आम्ही का लढतोय हे आम्हाला माहीत आहे. आमच्यासाठी विचार महत्त्वाचे आहेत म्हणून आम्ही विचारासाठी लढत आहोत.

 

पैशाची ताकद मोठी की लोकांची हे लवकरच समजेल

तिथून पैसा, ताकद, दबावतंत्र मोठय़ा प्रमाणावर असू शकते. इथे सामान्य नागरिक, स्वाभिमानी लोक आणि आम्ही सगळे जण पवार साहेबांच्या बरोबर आहोत. पैशाची ताकद मोठी की, लोकांची ताकद मोठी हे लवकरच समजेल, असेही रोहित पवार म्हणाले.

 

भाजपने अजित पवारांना स्थानिक नेता करून टाकले

भाजपने अजित पवारांची लोकल नेते अशी नवीन ओळख निर्माण केली आहे. आम्ही आधी त्यांना म्हणत होतो की, तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही देशात फिरले पाहिजे. पण भाजपने आता त्यांना एक स्थानिक नेता करून टाकले आहे. ते आता सोसायटय़ा, गल्ल्यांमध्ये प्रचारासाठी फिरू लागले आहेत, असे रोहित पवार म्हणाले.

 

शेतकऱयांसाठी ज्या महाराष्ट्राच्या लेकीने संसद केठीस धरली तिच्या पाठीशी उभे राहा!

संसदेत राष्ट्रकादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला अत्याचार असो की, शेतकरी, महाराष्ट्राचे सगळेच किषय अतिशय ताकदीने लाकून धरले आहेत. संसदेत सर्काधिक उपस्थितीही त्यांचीच आहे. महाराष्ट्रातील शेतकऱयांसाठी ज्या लेकीने संसद केठीस धरली तिच्या पाठीशी उभे राहा, असे आकाहन रोहित पाटील यांनी बारामतीकरांना केले. सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात आज प्रचारसभा झाली. त्याकेळी ते बोलत होते. याकेळी सुप्रिया सुळेंसह शरद पकारदेखील उपस्थित होते.