सुट्टीत भरणार ‘चेटकिणीची शाळा!’

शाळेच्या परीक्षा संपून बच्चे कंपनीला सुट्टय़ा लागल्या आहेत. यंदाची उन्हाळी सुट्टी बच्चे कंपनीसाठी खास असणार आहे. याचे कारण म्हणजे पल्लवी फाऊंडेशन ‘चेटकिणीची शाळा!’ हे धम्माल विनोदी नाटक घेऊन येत आहे.

अभिप्राय पारकर लिखित व दिग्दर्शित आणि डॉ. भाऊ कोरगावकर, शलाका कोरगावकर निर्मित या नाटकाच्या शुभारंभाचे दोन प्रयोग प्रबोधन प्रयोगघर, कुर्ला पूर्व येथे सादर होत आहेत. गुरुवार, 2 मे रोजी सकाळी 11 वाजता आणि दुपारी 1 वाजता शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. अभिनेते सचिन शिर्पे यांनी यासाठी मार्गदर्शन केले आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा फेम’ बालकलाकार प्राजक्ता ढेरे ही चेटकिणीच्या भूमिकेत आहे. याशिवाय सर्वज्ञ घोलप, अंकिता लोकरे, सोनाक्षी लाडे, स्वरा जाधव, जिज्ञासा चव्हाण, संस्कृती शिरगावकर आदी छोटी मंडळी कल्ला करायला सज्ज आहेत. सुट्टी लागली की, काही मुले आई-वडिलांच्या इच्छेप्रमाणे विविध क्लासमध्ये अडकतात, परंतु दर्जेदार अभिनयाने परिपूर्ण आणि हसून हसून पोट दुखायला लावणारा नाटय़खजिना प्रेक्षकांना निखळ आनंद देणार आहे.