तुम्ही मोजले नाहीत म्हणून मजुरांचे मृत्यू झाले नाहीत का? राहुल गांधी यांचा मोदी सरकारला सवाल

285

कोरोना लॉकडाऊनच्या काळातील स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूची माहिती लपविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. अपघात आणि उपासमारीमुळे अनेकांना प्राण गमवावे लागलेले असताना जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करणाऱया मोदी सरकारवर कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तुम्ही मोजले नाहीत म्हणून मजुरांचे मृत्यू झाले नाहीत का, असा सवाल त्यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

लॉकडाऊनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आणि किती जणांची नोकरी गेली याची माहिती मोदी सरकारला नाही. तुम्ही मोजले नाहीत म्हणून मजुरांचे मृत्यू झाले नाही का? परंतु सरकारवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यांचे मरण सर्वांनी पाहिले. परंतु एक मोदी सरकार ज्यांना त्याची माहितीही मिळाली नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या