
सामना ऑनलाईन । मालडा
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या प्रचाराला मालदा येथून सुरुवात केली. मालदा येथे झालेल्या काँग्रेसच्या रॅलीत राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ‘पश्चिम बंगालचे सरकार हे फक्त एका व्यक्तीसाठी चालवले जात आहे’, अशी बोचरी टीका राहुलने ममता बॅनर्जी यांच्यावर केली.
Rahul Gandhi in Malda: Aapne salon CPM ko dekha, phir aapne Mamata ji ko chuna, jo atyachaar CPM ke samay hota tha, wahi atyachaar Mamata ji ke samay mein ho raha hai. Us waqt ek sangathan ke liye sarkar chalai jati thi, aaj ek vyakti ke liya chalai jati hai. #WestBengal pic.twitter.com/7WLM0iYcBj
— ANI (@ANI) March 23, 2019
“अनेक वर्ष तुम्ही माकपचे सरकार पाहिले. नंतर तुम्ही ममताजींना निवडणून दिले. जो अत्याचार माकपच्या सरकारमध्ये होत होता. तो आता ममता बॅनर्जींच्या सरकारमध्येही सुरू आहे. त्यावेळी सरकार एका संघटनेसाठी काम करत होते तर आता एका व्यक्तीसाठी सरकार चालवले जातेय. इथेही तरुणांना रोजगार मिळालेला नाही. शेतकऱ्यांना मदत मिळालेला नाही. एकीकडे नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खोटी आश्वासने देत आहेत”, अशी टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली.
Congress President Rahul Gandhi in Malda: Did the youth get employment, did the farmers receive any help? On one hand Narendra Modi ji lies and on the other hand your Chief Minister keeps on making promises but nothing happens. #WestBengal pic.twitter.com/MDjSWHJ8dx
— ANI (@ANI) March 23, 2019
























































