मोदी तिरस्काराचं विष पसरवतायत, राहुल गांधींची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वायनाड

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान खोटा प्रचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची दिशाभूल तर केलीच. त्याचबरोबर देशात तिरस्कार आणि विभाजनाचे विष पसरवून देशातील जनतेत फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

केरळमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडमध्ये आले होते. उत्तर प्रदेशातील अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून हार पत्करावी लागली असतानाच वायनाडमधील जनतेने मोठय़ा मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त करत त्यांनी तेथील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

राष्ट्रीय पातळीकर आज आम्ही किषाशी लढा देत आहोत. मी कठोर शब्द कापरतोय असे तुम्हाला काटत असेल, पण पंतप्रधान मोदी हे देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी द्वेषाच्या किषाचा कापर करत आहेत. पंतप्रधान मोदी हे देशातील सर्कात काईट भाकनेचे प्रतिनिधित्व करतात. ते राग, द्वेष, भीती आणि खोटेपणाचे प्रतिनिधित्क करतात. मात्र कायनाडच्या प्रत्येक नागरिकासाठी काँग्रेस पक्षाचे दरकाजे सदैक उघडे आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.