रेल कामगार सेनेतर्फे आदित्य कुमार यांचा सत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rail-kamgar-sena-felicitates-new-central-railway-pcpo-aditya-kumar

मध्य रेल्वेचे नवनियुक्त प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आदित्य कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर रेल कामगार सेनेतर्फे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे सरचिटणीस तथा शिवसेना उपनेते दिवाकर देव (बाबी) आणि कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली हा समारंभ पार पडला. यावेळी कर्मचारी हित, सुरक्षितता, सेवा-सुविधा आणि प्रशासनातील समन्वय अधिक दृढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आदित्य कुमार यांनी कर्मचारी हितासाठी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली जाईल, अशी ग्वाही दिली.