राष्ट्रीय शरीरसौष्ठवात चमकदार कामगिरी; रेल्वेच्या खेळाडूंचा रेल कामगार सेनेकडून सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते माजी  खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव, संयुक्त सरचिटणीस नरेंद्र शिंदे व चंद्रकांत मस्के  यांच्या सहकार्याने राष्ट्रीय शरीरसौष्ठवात उत्कृष्ट कामगिरी साकारत पारितोषिक मिळवणाऱया  रेल्वे कामगारांचा   रेल कामगार सेना ऑफिसमध्ये विशेष सत्कार करण्यात आला.

60 किलो गटात इंटर रेल्वे चॅम्पियन व खमाम येथे तेलंगणा स्टेट येथे 13 वी सीनियर नॅशनल बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप मिस्टर इंडिया हा किताब पटकावणारा वैभव महाजन, इंटर रेल्वे चॅम्पियनशिपमध्ये मागील दोन वर्षांपासून सुवर्णपदक विजेता आणि 80 किलो गटात व सीनियर नॅशनलला चौथा क्रमांक मिळवणारा गणेश जाधव, 70 किलो गटात इंटर रेल्वे चॅम्पियनशिप गोल्ड मेडल व सीनियर नॅशनल पार्टिसिपन्ट प्रतीक पांचाळ,  55 किलो इंटर रेल्वे ब्रांझ मेडल मिळवणारा राहुल दाभेकर, इंटर रेल्वे स्पर्धेत  100 किलो गटात सुवर्णपदक  व सीनियर नॅशनल पार्टिसिपंट  आणि  इंटर रेल्वे स्पर्धेत 85 किलो गटात रौप्य पदक पटकावणारा प्रवीण चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या सत्कारावेळी रेल कामगार सेनेचे उपाध्यक्ष भारत शर्मा, मल्हारी भटाटे, हितेश भोले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळय़ासाठी  रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी डी. जे. सेनगुप्ता  (मध्य रेल्वे स्पोर्टस् असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी). गेम सेक्रेटरी  के. के. ठाकूर व सीनियर स्पोर्टस्  ऑफिसर अशोक शांडिल्य यांचे विशेष सहाय्य मिळाले.