महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का आहेत? हाथरस घटनेवरून राज ठाकरे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेली घटना ही मन विषण्ण करणारी आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच, महाराष्ट्रात काहीही झाले तरी स्वतःला देशाचा आवाज घोषित करून अर्वाच्य पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?’ असा सवाल ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर या घटनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पीडित मुलीच्या घरच्यांना भेटायला कुणी जात असेल तर त्यांना अडवले का जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे? असे राज ठाकरे यांनी विचारले आहे. त्यांनी माध्यमांनाही प्रश्न विचारला आहे. सर्व माध्यमे उत्तर प्रदेश सरकारवर तुटून पडून त्यांना जाब का विचारत नाहीत? असे त्यांनी म्हटले आहे. हाथरसमधील घटना पाशवी आहे. अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतक्र्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.