राजा रामस्वामी बीडचे नवे पोलीस अधीक्षक

बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबई गुप्त वार्ता विभागातील राजा रामस्वामी हे बीडचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत. हर्ष पोद्दार यांची अद्याप कोठे ही नियुक्ती करण्यात आली नाही

दीड वर्षांपूर्वी बीडच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्त झालेले हर्ष पोद्दार यांच्या बदलीचे आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आले. त्यांच्या जागी राजा रामस्वामी हे नवीन पोलीस अधीक्षक असणार आहेत. हर्ष पोद्दार यांचा बीड मधील कालावधी स्मरणात राहण्यासारखा गेला आहे. अत्यंत उमदा अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे अनेक धाडसी निर्णय घेत कायद्याला अनुसरून त्यांनी आपला कारभार केला, लोकसभा अन विधानसभा निवडणुकासह अनेक नाजूक प्रकरण अत्यंत प्रभावीपणे हाताळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पोलीस दलात शिस्त आणण्याचे काम केले. आपला दरारा अन धाक निर्माण करत जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढण्याचे काम त्यांनी केले होते. अत्यन्त संवेदनशील मनाचा अधिकारी ही त्यांची दुसरी बाजू ही अनेक प्रकरणात समोर आली होती, त्यांच्या जागी राजा रामस्वामी हे लवकरच रुजू होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या