राज्यसभा निवडणूकीत भाजपचा ‘गोंधळ’, मतमोजणी रखडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात आज राज्यसभेसाठी निवडणूक पार पडली. भाजपने सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड व यशोमती ठाकूर यांची मतं बाद करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. या तिघांनी बॅलोट पेपरमध्ये मतं टाकण्याआधी ती दाखवली असा दावा भाजपने केला. भाजपची ही तक्रार निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळली होती. मात्र त्यानंतर भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभेची मतमोजणी रखडली असून आता केंद्रीय आयोगाच्या निर्णयाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

मविआची देखील रवी राणा व सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात तक्रार

मविआच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून अपक्ष आमदार रवी राणा व भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मतं बाद करण्याची मागणी केली आहे. मविआवे निवडणूक आयोगाला पत्र लिहून ही मागणी केली आहे. राणांनी हनुमान चलिसा दाखवून हिंदू मतदारांना प्रभावित केले तर मुनगंटीवारांनी निवडणूक पत्रिका दुसऱ्या उमेदवाराला दाखवली असे या पत्रात म्हटले आहे.