
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून हे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि अधीर रंजन चौधरी या तिघांनाही वैयक्तिकरित्या हे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, एच. डी. देवेगौडा यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
























































