बलात्कारी आणि दहशतवाद्यांना ऑन द स्पॉट शिक्षा झाली पाहिजे – बाबा रामदेव

535

हैदराबाद येथे वेटरनरी डॉक्टरचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या चारही आरोपींचा शुक्रवारी सकाळी पोलीस एनकाऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. योगगुरू रामदेव बाबा यांनी पोलिसांच्या या कारवाईचे समर्थन केले आहे. ‘बलात्कारी आणि दहशतवाद्यांना अशाच प्रकारे ऑन द स्पॉट कारवाई केली गेली पाहिजे’,असे सांगत त्यांनी आजच्या कारवाईचे समर्थन केले आहे.

‘जे अशा प्रकारचे गुन्हे करतात ते देशावरचे कलंक असतात. त्यांच्यामुळे देश, धर्म व संस्कृतीची बदनामी होते. त्या बलात्काऱ्यांसोबत व आतंकवाद्यांवर ऑन द स्पॉट कारवाई करण्याचे अधिकार पोलीस व सेनेला दिले गेले पाहिजे. आणि त्यांनी अशा प्रकारचीच कारवाई केली पाहिजे’, असे रामदेव बाबा म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी ज्या प्रकरणांमध्ये थोडाफार संशय असेल ती प्रकरणंच न्यायालयात गेली पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या