
पोलीस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कथित धक्काबुक्की आणि लाठीचार्जमध्ये जखमी झालेले राष्ट्रीय जनता दल (RJD) चे आमदार सतीश कुमार यांना स्ट्रेचरवरून बिहारच्या सभागृहाबाहेर नेण्यात आलं. सतीश कुमार हे बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयक 2021 च्या विरोधात आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांना धक्काबुक्की झाल्याचं समोर आलं आहे. (Bihar Special Armed Police Bill 2021.) पाहा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कशी वागणूक दिली जाते असे ते म्हणाले.
राजद विधायक को लोकतंत्र के मंदिर में सादे कपड़ों में मौजूद गुंडा सरकार के नरभक्षी शासकों के गुंडों ने इतना पीटा कि उन्हें स्ट्रेचर पर एम्बुलेंस में लेकर जाना पड़ा।
वो कह रहे है कि ज़ालिम नीतीश जी हत्या करवा देंगे। वैसे भी CM को हत्या करने-कराने का पुराना अनुभव है। pic.twitter.com/BFGxeslLZB
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) March 24, 2021
दरम्यान, विरोधी पक्षातील महिला आमदारांना महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सभागृहाबाहेर नेलं. हे आमदार विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांना चेंबरच्या बाहेर येण्यास रोखत होते.
राज्यसभा खासदार मनोजकुमार झा यांनी सभागृहात नोटीस देत नियम 267 अंतर्गत बिहारमधील क्रूर लाठीचार्ज प्रकरणी चर्चा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.




























































