रत्नागिरीत 24 तासांत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू

मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासात सर्वाधिक मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 11 जणांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा दोनशे पार गेला आहे. आता पर्यंत जिह्यात 209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होत चालला आहे. मागील चोवीस तासात 69 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 6 हजार 605 वर पोचला आहे. आज 175 रूग्ण बरे होऊन घरी परतले.

आपली प्रतिक्रिया द्या